Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत जन्म होणे ही महादेवाची साक्षात कृपा | प.पु.प्रदीपजी मिश्रा


आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही- प.पु.प्रदीपजी मिश्रा

वैद्यनाथांच्या भूमीत जन्म होणे महादेवाची साक्षात कृपा आहे परळी वैजनाथ शहरात मथुरा प्रतिष्ठान द्वारा आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेच्या तृतीय दिनी श्रोत्यांनी कथेचे मनोभावे श्रवण केले आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात कधीही दुःख येणार नाही असे प्रतिपादन

आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी केले.



श्रावण पर्वात होत असलेल्या या कथा श्रवणासाठी विविध राज्यातील भाविक परळीत दाखल झालेले आहेत.तृतीयदिनी कथावक्त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला.बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे.आपले मन शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही.भगवंताला नित्य जलाभिषेक करा याचे फळ तुम्हाला कुठे ना कुठे तरी मिळणारच आहे. काही झाले नाही तर एक लोटा जल महादेवाला दररोज वाहत जावे.याबरोबरच नियमीत संतसेवा करा संतामुळे सत्संग मिळतो असे विवेचन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी कथेत केले.


तृतीय दिनीही गुरुजींनी व्यासपीठावरून शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्र वाचन केले.

कथा स्थळी शकंर पार्वती झाकी ने उपस्थितीतांना साक्षात भगवंताच्या दर्शनाची अनुभूती आली.आरतीने तृतीय दिन कथेची सांगता झाली,यावेळी मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्या परिवारासमवेत

माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आरती केली. कथेचे श्रवण करण्यासाठी आज मंडपात भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.


प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत जन्म होणे ही महादेवाची साक्षात कृपा


गेले तीन दिवस मी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या परळीत आहे. इथे जन्माला येणे म्हणजे साक्षात महादेवाची कृपा असे म्हणावे लागेल. शिवाय महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात असलेल्या गावात आपले सासर असणेही भाग्याचे लक्षण आहे. असे ही प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी परळीचे महात्मे विशद करताना म्हटले आहे परळी वैद्यनाथ भूमीचा महिमा विशद केली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या