Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भीषणअपघातात माय लेकराचा मृत्यू | आपात्कालीन व्यवस्था नुसत्या नावालाच...




परळी सिरसाळा रस्त्यावर दोन कारचा समोरासमोर अपघात होऊन या अपघातात पोलीस कर्मचारी असलेल्या महिला व त्यांचा मुलगा असा दोघांचा या अपघातात मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. 



भीषणअपघातात माय लेकराचा मृत्यू | आपत्कालीन व्यवस्था हे नावालाच...

परळी सिरसाळा महामार्गावर आज सकाळी दहा वाजता दोन कार समोरासमोर धडकून या अपघातात दिंद्रूड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल शिंदे आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
चालक व डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

परळी व सिरसाळा येथे असणारे आपत्कालीन प्राथमिक उपचार यंत्रणा हे नावालाच असून येथे कोणत्याही मोठ्या आजाराचे निदान होत नसून किरकोळ आजारावर उपचार करणाऱ्या या परळी उपजिल्हा रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेकांच्या जीवाशी खेळत आहेत. 108 वाहनाला कॉल केला तर अपघात स्थळी लवकर पोहोचत नसल्याची तक्रार ही नागरिक करत आहेत अशाच कारणांमुळे विनायक मेटे यांचाही अपघातात वेळीच उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून यावर शासकीय यंत्रणा उपाययोजना करत नसल्यामुळे अपघातातील बळीचे संख्या वाढत आहे

 महिला पोलीस कर्मचारी शिंदे हे मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दिंद्रूड येथील पोलीस कर्मचारी कोमल शिंदे याआजारी मुलाला परळीस कारमध्ये  उपचारासाठी घेऊन जात होत्या.
पोलिस अधिकारी नवनाथ हे कार चालवत होते.परळीकडून दुसरी कार समोरून आली असता सिरसाळाजवळ दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. 

पोलीस शिपाई शिंदे आणि त्यांचा मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला. यात चालक जखमी झाला असून दुसऱ्या कारमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या गाडीतील जखमी व्यक्ती हे वैद्यकीय अधिकारी डॉ.इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. सिरसाळा पोलीस व नागरिकांनी जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या