भावसार युवा सेवाभावी संस्था आयोजित भव्य तिरंगा रॅली संपन्न
गुड न्यूज सर्वांसाठी दररोज सकाळी
परळी-मिरज एक्स्प्रेस धावणार....
परळीत या आगळ्यावेगळ्या शिस्तबद्ध रॅलीचे सर्वत्र कौतुक स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्याने परळीत भावसार युवा सेवाभावी संस्थेच्यावतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती.यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने भावसार युवा सेवा भावी संस्थेच्यावतीने रॅली मध्ये सुंदर असा देखावे करण्यात आले होते. रॅली मध्ये असलेला दिल्ली येथील लाल किल्ला कार्यक्रमाचे देखावा आकर्षण ठरला...
रॅली मध्ये सहभागी चिमुकल्या लहान थोर मंडळींनी भारत माता, जिजामाता,छत्रपती शिवाजी महाराज आणि महिला आर्मी आदींची वेशभूषा रॅलीकडे सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली.यारॅली मध्ये सादर करण्यात आलेली भारताच्या संस्कृती मधील आदिवासी बांधवांचा बँड व नृत्य परळीकरां खास आकर्षण ठरले.
ही रॅली परळी शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे सामूहिक राष्ट्रगीतांने संपन्न झालीया रॅली मध्ये भावसार समाजातील जेष्ठ पासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांचा सहभाग होता विशेष म्हणजे सर्व शिस्तबद्ध नियोजन पूर्ण रॅलीने परळीकर यांचे लक्ष वेधून घेतले.
Social Plugin