Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अतिथी देवो भव ही आपली धार्मिक संस्कृती-प.पु.प्रदीपजी मिश्रा

 










अतिथी देवो भव ही आपली धार्मिक संस्कृती-प.पु.प्रदीपजी मिश्रा

परळी वैद्यनाथ अतिथी देवो भव ही आपली धार्मिक संस्कृती आहे.अतिथी सेवेने अनेक पापे नष्ट होतात असे प्रतिपादन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी मथुरा प्रतिष्ठाण द्वारा वैद्यानाथाच्या पावन नगरीत होत असलेल्या श्री अभिषेक महापुराणच्या द्वितीय दिनाच्या कथेत केले.कथेचे स्वागताध्यक्ष धनंजय मुंडे यांनी महाराजश्रींचे शब्दसुमनाने स्वागत केले.परळीत असलेले वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हेच पाचवे ज्योतिर्लिंग असून दुसरे कोणते नाही असे ते यावेळी म्हणाले.,.


द्वितीय दिवशीच्या कथेत आंतरराष्ट्रीय कथावाचक प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी शिवकथेचा महिमा उपस्थित श्रोत्यांना वर्णीत केला.प्रारंभी आणि शेवटीला शंकर भगवान आहेत,परमात्माच्या भक्तीतच सुख आहे.कुणाच्या आत्म्याला धक्का लागू नये असे आपण कोणालाही बोलू नये. शरण जाणाऱ्या प्रत्येकाला शंकर भगवान तारतात.अतिथी देवो भव ही आपली धार्मिक संस्कृती आहे यामुळे अनेक पापे नष्ट होतात.शिवरात्र म्हणजे शंकराचा प्राकट्य दिवस आहे.


कथेवेळी हे भोळ्या शंकरा भजनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कथेस्थळी विविध देवदेवतांच्या झाक्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवमहापुराण कथेच्या द्वितीय दिनीही महाराजश्रींनी विविध भक्तांनी पाठवलेले पत्र वाचून दाखवले.


या कथेसाठी शिवभक्त विविध राज्यातून दाखल झालेले आहेत.

महाआरतीने कथेची सांगता झाली आरतीसाठी नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकडी आणि बीड येथील प्रशासकीय अधिकारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या