Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुड न्यूज सर्वांसाठी दररोज सकाळी परळी-मिरज एक्स्प्रेस धावणार....

गुड न्यूज  सर्वांसाठी दररोज सकाळी  परळी-मिरज एक्स्प्रेस  धावणार....

PARLI-BEED,


    मिरज-परळी एक्स्प्रेस आणि परळी-मिरज एक्स्प्रेस सुरू  करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला दि.15 ऑगस्ट पासून ही रेल्वे सुरू झाली आहे.

परळीच्या रेल्वे स्थानकावरून दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे परळी आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे.

    त्यात परळी-मिरज व परळी-मिरज रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. 


    परळी-मिरज रेल्वे पूर्ववत सुरू होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.खा. प्रीतम मुंडे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, रेल्वे अधिकारी उदय भगरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. 


 रेल्वे क्र.11412

 दि 15ऑगस्टपासून मिरजेहून 21;00वाजता सुटून 06;10 वाजता परळीला पोहोचेल आणि

 रेल्वे क्र.11411

दि 16 ऑगस्टपासून परळीहून 07;25 वाजता सुटेल आणि 17;55 वाजता मिरजला पोहोचेल. तर 


    परळी मिरज ते घाटनांदूर, पानगाव, जानवल, वडवळ नागनाथ, कारेपूर, लातूर रोड, लातूर, ढोकी येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, धालगाव या मार्गाने मिरजेकडे जातील. दरम्यान, ही गाडी वडवळ नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनांदूर स्थानकावर थांबेल. 


या रेल्वेला 10 जनरल डबे असतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या