Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

9 दरोडेखरांना पोलिसांनी केले जेरबंद | बीडच्या दोघांचा समावेश


9 दरोडेखरांना
पोलिसांनी पाठलाग करुन घेतले ताब्यात

राहुरी घाटात लपून बसलेल्या नऊ दरोडेखोरांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील दोन दरोडेखोरांचा समावेश आहे. 

   तुळशीराम दामू मेगल (वय 35), बाळू शिवराम आगिवळे (वय 21), अंकुश लक्ष्मण मेगल (वय 25, चौघेही रा. ठाकूरवाडी, जि. खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद), अमोल संपत शिंदे (वय 33), कल्पना अमोल शिंदे (वय 33 रा. 25, दोघे रा. खांबे, जि. संगमनेर),   गेवराई येथील एक अल्पवयीन मुलगा रा .जि.बीड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 


   कोळेवाडी घाटात काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस नाईक रामनाथ सानप, चालक खेडकर यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला. 


पोलीस पथकाला पाहताच अंधारात लपून बसलेले आरोपी पळून गेले. ग्रामस्थ व पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून नऊ जणांना अटक करून दोन लाख किमतीची जीप, दोन दुचाकी, पाच मोबाईल, गज, आरे, दोरी, मिरची पूड असा एकूण दोन लाख 56 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला 


याप्रकरणी हवालदार जानकीराम कुशाबा खेमनर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या