Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अवैध गर्भपात पोलिसाची मोठी कारवाई रॅकेट पुन्हा सक्रिय

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात पोलिसाची मोठी कारवाई रॅकेट पुन्हा सक्रिय 


PARLI-BEED



बीड जिल्ह्यात पुन्हा गर्भपाताची राकेट सक्रिय झाल्याची माहिती व या प्रकरणात महिलेच्या गर्भपातासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्यांचा बॅच क्रमांक एकच असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. 


या गर्भपात प्रकरणी अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिला पोलिसांनी गेवराई येथून अटक केली होती. बीड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात मनीषा सानप हिच्या गर्भपाताच्या गोळीचा एकच बॅच क्रमांक आणि गर्भधारणेच्या गोळीचा एकच बॅच क्रमांक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे 


या सर्व प्रकरणानंतर आता औषध प्रशासनाने बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र लिहून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्रांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. बीड बेकायदेशीर गर्भपात बाकरवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपात प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. जास्त रक्तस्त्राव झाल्याने सीता गाडे यांचा मृत्यू झाला होता.


यानंतर तपास सुरू असताना या गर्भपात प्रकरणी ज्या परिचारिकेवर गुन्हा दाखल आहे, तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांना असल्याने आरोग्य विभाग कारवाई करत आहे. 


या प्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली होती. पोलीस तपासात याप्रकरणी तरुणीच्या गेवराई येथून एका महिला एजंटला अटक करण्यात आली होती. याच एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बीड शहरातील परिचारिका सीमा सुरेश डोंगरे आणि मृत महिलेच्या पाच नातेवाईकांविरुद्ध सकाळी गुन्हा दाखल केला होता. परिचारिका सीमा डोंगरे फरार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक बडी मासे करायला लागण्याची शक्यता असल्यामुळे नर्स डोंगरेचा खून की आत्महत्या हे अजूनही निष्पन्न नाही यावर पडदा टाकण्याचे काम कोण करत आहे याविषयी नागरिकांच्या चर्चा आहे.



पोलीस त्यांचा शोध घेत असताना बीड ग्रामीण पोलिसांना पाली येथील बिंदुसरा धरणात अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची चौकशी केली असता हा मृतदेह गर्भपात प्रकरणातील आरोपी सीमा डोंगरे हिचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या