Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हायवा' प्रकरणातील | फरार आरोपी |पोलिसांच्या ताब्यात

 4 जणावर गुन्हा दाखल मुख्य आरोपीस अटक 




हायवा' प्रकरणातील | फरार आरोपी |पोलिसांनी  ताब्यात घेतला असून परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा 119/ 2022 कलम 406 ,504, 506, 34  हायवा चोरी व  विश्वास घात प्रकरणात आरोपी तय्यब रहमान सय्यद राहणार इसाद यांच्या विरुद्ध शेख छोटुमिया खाजामिया रा. मिरवट तालुका परळी जि बीड यांच्या फिर्यादीवरून परळी आरोपी तय्यब रहमान सय्यद राहणार इसाद तालुका गंगाखेड जिल्हा परभणी व इतर चार जणावर गुन्हा दाखल केला असुन मुख्य आरोपीस अटक करण्यात आले असून इतर आरोपीचा तपास सुरू आहे.


ग्रामीण पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीचा हायवा टिप्पर  मागील आठ महिन्यापासून तय्यब रहमान सय्यद राहणार ईसाद याला शेख छोटुमिया खाजामिया राहणार मिरवट काही गावातील मित्रा समक्ष किरायाने दिला होता परंतू  रहमान सय्यद यांनी विश्वास घात करून सदरील हायवा टिप्परचा किरायाही दिला नाही ते कोणाला तरी विकला असावा असा संशय आहे तसेच किरायाची पैशाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता म्हणून परळी ग्रामीण पोलीसात तक्रार दिली होती.  


परंतु तीन महिन्यापासून ग्रामीण पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी सापळा रचून तपासी अंमलदार राम केकान ,रमेश तोटेवाड, गणेश येरडलावार व  वाहन चालक वखरे यांनी सापळा रचून आरोपीस इसाद येथून अटक केलेली याचा तपास परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अंमलदार राम केकान आहे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या