Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली अद्याप रेल्वेच नाही

  BEED | स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली अद्याप रेल्वेच नाही





बीड जिल्हा येथील मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असलेले व स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये क्रांतीकारकांची मायभूमी असलेले अंबाजोगाई शहराला अद्याप रेल्वे आलीच नाही.


देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली,शासन दरबारी निवेदने दिली.परंतु,रेल्वेमात्र आलीच नाही.अनेकांनी रेल्वेचा प्रवास अनुभवला देखील नाही.


अंबाजोगाईला रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी येथील जनता पन्नास वर्षांपासून मागणी करीत आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. येथील दोन लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्री झाले. 


परंतु,त्यांनी अंबाजोगाई रेल्वे मार्गाकडे दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते भारत पसारकर यांनी अनेकवेळा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदने पाठविली, हजारों पोस्टकार्ड पाठविली, पाठपुरावा केला तरीही या गावाला अजूनही गाव रेल्वे पासून आजही वंचित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या