Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भीषण अपघात |विनायक मेटे यांचे निधन |मराठा समाजाचा आवाज हरवला

 ही बातमी वाचा.. राजकारणात विचार राहिला आहे ना चळवळ राहिली -राज ठाकरे*

*https://bit.ly/3oIUNi5
सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....*

https://aplaepaper.blogspot.com


विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात की घातपात चौकशी करावी कार्यकर्त्यांची मागणी


PARLI-BEED,

बीड जिल्हा आशा अपघातांमध्ये दोन मोठ्या व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे या अगोदरही अशीच अपघाताची घटना आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांच्या बाबतीत घडला होता आज तशाच अपघाताची पुनरावृत्ती आमदार विनायक मेटे यांच्यासोबत घडल्याची चर्चा होत आहे त्यामुळेच अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी, शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात पहिले आमदार, त्यानंतर सलग पाचवेळा विधानपरिषदेचे सदस्य राहिलेले  विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माडप बोगद्यात अपघात झाला. अपघातानंतर जवळपास तासभर मेटे यांना कोणतीही मदत मिळाली नाही. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 



मेटे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक आणि चालक यांची प्रकृती चिंताजनक असून, मेटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मेटे यांच्या गाडीच्या स्थितीवरून हा अपघात किती गंभीर होता हे स्पष्ट झाले. मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावरून मुंबईच्या दिशेने येत होती. महामार्गावर पनवेल ते खालपूर दरम्यान माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. 




मेटे यांच्या कारने समोरून येणाऱ्या  वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मेटे यांच्या कारच्या डाव्या बाजूचा चुराडा झाला आहे. अपघातानंतर तासभर मेटे यांना कोणीही मदत केली नाही. त्यानंतर त्याला एमजीएआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अशी माहिती मिळाली आहे.त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते आहे. 


अपघातानंतर तासभरही मदत मिळाली नाही. बीडहून मुंबईला येत असताना हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला एका ट्रकने धडक दिली. अपघातानंतर तासभर आम्हाला मदत मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले. आम्ही 100 ला फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. मी सगळ्यांना मदतीची याचना करत होतो पण कोणीही गाडी थांबवली नाही. रस्त्यावर झोपलो होतो, तेवढ्यात एका ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. 


तासाभराने रुग्णवाहिका आली. असेही एकनाथ कदम म्हणाले. अपघाताच्या वेळी मेटे यांच्यासोबत एकनाथ कदम होते. याअपघातात कदम यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तासभर कोणीही मदतीला आले नसल्याचे कदम म्हणाले. यंत्रणेनेही मदत केली नसल्याचे त्यांनी सांगितले.कोण होते विनायक मेटे? विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे नेते होते. मेटे हे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी अनेकदा आंदोलने केली. अरब हे समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्षही होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या