Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |पाटोदाजवळ झालेल्या भीषण अपघातात |6 जणांचा जागीच मृत्यू

 

Beed parli,

पाटोदाजवळ झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू


 बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील बामदाळे वस्तीजवळ स्विफ्ट कार आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार आयशर कारखाली अडकली. त्यामुळे कारमधील लहान मुलांसह ६ जण जागीच ठार झाले आहेत. पुण्याहून आपल्या मुलीला घेऊन जिवाची वाडी ता. केज येथे लग्नासाठी जात असताना पाटोदा शहराजवळील बामदाळे वस्ती येथे सकाळी सातच्या दरम्यान आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये अपघात झाला आहे.


यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिवाची वाडी येथील रहिवासी रामराव प्राथमिक माहिती अशी की, कुटे हे कुटुंबासह पाच दिवसांच्या सुट्टीसाठी जात असताना अपघात झाला आहे. हा एवढा मोठा होता की स्विफ्ट कार आयशर टेम्पोखाली अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला आहे, गाडीची अक्षरश: कोंडी झाली होती. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक  कार्यकर्ते नागरिक पोलीस प्रशासन यांनी वेळीच मदत कार्य सुरू केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या