Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या'शाळेच्या तिरंगा रॅलीत अवतरले क्रांतीकारक..| आणि शाळेचा परिसर तिरंगामय झाला



या'शाळेच्या तिरंगा रॅलीत अवतरले क्रांतीकारक..|    परळीमध्ये आज विवेकवर्धिनी विद्यालयामध्ये भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेली तिरंगी रॅली उत्साहात साजरी झाली. यारॅलीमध्ये लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग,राजगुरू,सुखदेव, सुभाषचंद्र बोस,भारत माता इत्यादींच्या वेशभूषा करून आलेली मुले यारॅलीचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. 


या रॅलीचा निरोप समारंभ विवेकवर्धिनी विद्यालयात झाला निरोपाच्या वेळी विद्यार्थ्यांना खिचडी तसेच चॉकलेटचे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष  समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव इटकेसर तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश नाना नागरगोजे,वसंत कांबळे, अविनाश गवळी, सुरेश गीते,अभिजीत मुंडे, पप्पू काळे हे होते.


या कार्यक्रमात तिरंगा ध्वज  याविषयी नीला सरांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेत्रे सर यांनी केले व सूत्रसंचालन सुरेश कराड सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नांदुरकर सर,संजय कराड सर, सहशिक्षक खेत्रे सर, निलासर, कराड सर, मुंडे मॅडम,साखरे मॅडम इंगळे मॅडम,कोकणे मॅडम व नंदी कोले मॅडम तसेच गादेकर मॅडम यांनी परिश्रम केले


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या