Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हर घर तिरंगा अभियानांतर्गत भगवान विद्यालयात तिरंगा रॅली

 हर घर तिरंगा अभियानांतर्गत भगवान विद्यालयात तिरंगा रॅली




परळी येथील भगवान प्राथमिक शाळेत "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली उत्साहात संपन्न झाली.भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या आझादीचा अमृत महोत्सव देशभरात हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे. 




त्याचाच एक भाग म्हणून "हर घर तिरंगा" हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपापल्या घरावर देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज दि13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत लावायचा आहे. त्याची जनजागृती व अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शासनाने प्रत्येक शाळेने आपापल्या भागात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्याचे सूचित केले आहे. 


त्याचाच एक भाग म्हणून भगवान प्राथमिक विद्यालय शाळेत आज शुक्रवार दि12 ऑगस्ट रोजी शाळेच्या अध्यक्षा भाग्यश्री कराड व मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रँलीत शाळेतील काही विद्यार्थी विविध क्रांतीकारक यांच्या वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.


रँलीतील प्रत्येक विद्यार्थांच्या हातात तिरंगा ध्वज शोभून दिसत होता. हि तिरंगा रँली यशस्वी करण्यासाठी शाळेचे सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख अनंत मुंडे व सहप्रमुख अंजली कुलकर्णी यांच्यासह शाळेतील शिक्षक बंडू अघाव,  दत्तात्रय तिडके,अशोक वेडे, सिंधू सोनवणे, संघमित्रा वाघमारे, सचिन अंबाड,महेंद्र वाघमारे, राजेश विभूते, सुनील चव्हाण, सचिन गवळी व गोविंद मुंडे आदिनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या