Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धूम स्टाईलने बीड जवळ भर दिवसा चोरी 95 हजार रु लंपास

 

Beed

धूम स्टाईलने बीड जवळ
भर दिवसा चोरी 95 हजार रु लंपास 

बीड जिल्ह्यात चोरांच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यातच दरोडेखोरांना अटक केली असली तरी भर दिवसा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही अशी चर्चा सुरू असतानाच आज नुकतीचे घटना बीड जवळ घडली आहे. पाडळशिंगी जवळ एक जणांचा गाडीवर पाठलाग करून दुचाकीवर येऊन  पैशाने भरलेली बॅग लंपास केली.


बचत गटाची रक्कम जमा करून बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या बीड येथील आयडीएफसी बँकेच्या शाखेतील कर्मचारी सुदर्शन शिवाजी वाघ रा. माटेगाव, जि. बीड हे आज सकाळी  साडे अकराच्या सुमारास पाचेगाव जि. गेवराई येथून महिला बचत गटांची रक्कम बीड बँकेत जमा करण्यासाठी व पगार देण्यासाठी बीड येथे येत होते.

गेवराई-बीड महामार्गावरील पडळसिंगीजवळ येत असताना मागून एक दुचाकी  धुम स्टाईलने आली त्यावर दोन जण होते. त्यांनी दुचाकी जवळ येऊन पैशांची बॅग हिसकावून बीडच्या दिशेने धूम ठोकली.. या कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले होते.या बॅगेत 95, ही रक्कम 610 रु असल्याचे सांगितले जाते आहे.

याबाबत पोलीस कारवाई करत असून भर दिवसा चोरीच्या घटनात वाढ झाल्यामुळे नागरिकात दहशत निर्माण झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या