Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार..?



जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार..?


नवीन नियमांच्या निर्णयामुळे मुंबईत सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांचा विषय गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभाग संख्या बेकायदेशीर असल्याचे सांगून शिंदे सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


2011 च्या जनगणनेनुसार 2017 मध्ये प्रभागांची रचना आणि संख्या निश्चित करण्यात आली होती. आता त्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. 


2021 मध्ये जनगणना होणार होती, परंतु कोविड संकटामुळे जनगणना झाली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


 त्यामुळे महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदेच्या प्रभागांमध्ये करण्यात आलेली वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या