Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या लॉजवर प्रेमी युगलाचा मृतदेह सापडला | पोलीस तपास सुरू

 याघटनेने परिसरात खळबळ पोलीस तपास सुरू


या लॉजवर प्रेमी युगलाचा मृतदेह सापडला | पोलीस तपास सुरू


औरंगाबाद शहरातील लॉजमध्ये दोघांनाचा मृतदेह आढळून आला आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल पंजाब येथील लॉजमध्ये एक जोडपे एकाच खोलीत राहत होते. दोघेही २९ जुलैपासून हॉटेलमध्ये थांबले होते. आज सकाळी दोघेही हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्याला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


सागर राजेंद्र बावणे असे या मुलाचे नाव असून तो शहरातील सिडको भागातील रहिवासी आहे. तर  सपना अंकुश खंदारे असे या तरुणीचे नाव असून ती शहरातील मुकुंदवाडी भागातील रहिवासी आहे. 


या दोघांनी आपले जीवन का संपवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या