Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाई येथील एकाचा नाशिक येथे धबधब्यात वाहून गेल्याने मृत्यू

अडकलेल्या एकूण 23 लोकांपैकी 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश


PARLI-BEED,


PARLI-BEED,भरधाव वाहनाने उडवल्यामुळे ; एकाचा जागीच मृत्यू





अंबाजोगाई येथील एकाचा नाशिक येथे धबधब्यात वाहून गेल्याने मृत्यू  झाला आहे अंबाजोगाई, त्र्यंबकेश्वर नाशिक येथील दुगरवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या धबधब्याच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला अभियंता अविनाश हरिदास गरड वय 40 रा. सेलू जि. अंबाजोगाई असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तसेच धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 22 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. 


आत्तापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून फोटो काढत आहेत. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाण्याअभावी बंद पडलेले झरे आणि धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्रंबकेश्वर परिसरातील दुगरवाडी धबधबा परिसरातही अशीच गर्दी दिसून आली. 


त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधबा पाहण्यासाठी गेलेले लोक अडकले. अडकलेल्या एकूण 23 लोकांपैकी 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, 1 तरुण बेपत्ता असल्याचे आढळून आले. 


धबधब्याजवळ पर्यटक अडकल्याची माहिती आहे. मध्यरात्रीही बचावकार्य सुरू होते. मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अविनाश गरड हे धबधबा पाहण्यासाठी गेले होते ते वाहून गेले अविनाशचा शोध घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर सोमवारी शोध मोहिमेच्या पथकाला त्यांचा मृतदेह सापडला.


सविस्तर बातम्या ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूजसाठी आताच  

this link to join my WhatsApp group: 

https://chat.whatsapp.com/FAd5o3JAVLY1neuKlHAB8q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या