Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज अखेर मुहूर्त सापडला |मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

तब्बल 38 दिवसानंतर शिंदे फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ आज अखेर मुहूर्त सापडला


#eknathshinde,


आज अखेर मुहूर्त सापडला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार तब्बल 38 दिवसानंतर शिंदे फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ अखेर मुहूर्त सापडला आहे.  आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. काही मोजकेच ज्येष्ठ नेत्यांचा शपथविधी होणार 


भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा हे शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा या चार नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.  गृहखात्यासह महत्त्वाची खाती भाजपकडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात प्रामुख्याने मंत्रिपद मिळेल अशी अनेकांना आशा आहे. 


मात्र स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात काही नावांवर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता हवा असल्याचेही बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या