Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान |या लिंकवर पाच रुपये पाठवाल तर |तुमचे बँक खाते साफ होईल

लक्ष द्या |या लिंकवर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते साफ होईल



https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_4.html




सध्या पाच रुपयांच्या भेट वस्तूंचा गोंधळ सुरूच आहे. येथील पोलीस प्रशासनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना द्यावे लागत आहे,तरीही मात्र नागरिकांची लूट सुरू असल्याची चर्चा आहे.


सावधान |यालिंकवर पाच रुपये पाठवाल तुमचे बँक खाते साफ होईल



सोशल मीडियावर येणाऱ्या पाच रुपयांच्या नव्या लिंकने सध्या खळबळ उडाली आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तुमच्या नावावर महागडे कुरिअर आले आहे आणि ते मिळवण्यासाठी आमच्याद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पाच रुपये ऑनलाइन पेमेंट करा, तर हा कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचेल असा संदेश अनेकांना येत आहे. त्यानंतर या लिंकवर क्लिक करून पाच रुपये पाठवले तर काही वेळातच संबंधित नागरिकाच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब होत आहेत. 


नगर जिल्हा येथे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी जनजागृतीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यामुळे अशा लिंक ओपन किंवा डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन सानप यांनी केले आहे. अशा फसवणुकीला बळी पडणाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.