कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात राज्यपालांनी दिला मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा !
राज्यपाल उद्या गोपीनाथ गडावर जाणार
परळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज शहरात आगमन झाले. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधतांना त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे परळीत भाजपा कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत
राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी ३.४५ वा. शहरात आगमन झाले. श्रावण महिन्यानिमित्त वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचेसह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दर्शनानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे चेमरी विश्रामगृह येथे आगमन झाले, याठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटी, नगरसेविका उमाताई समशेट्टे, डाॅ. शालिनी कराड, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे, शहराध्यक्षा सुचिता पोखरकर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
उद्या गोपीनाथ गडावर
राज्यपालांनी कार्यकर्त्यांच्या भेटीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे साहेब माझे खूप चांगले मित्र होते, आम्ही एकत्र काम केले आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताई मुंडे काम करत असल्याचे ते म्हणाले . उद्या सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Social Plugin