Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भगवान शंकराची कथा |परिवार जोडायाला शिकवते|प.पु.प्रदीपजी मिश्रा



*live थेट परळीत प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा घरबसल्या आपल्या मोबाईलवर आनंद घ्या

*live थेट*

https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html


आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक -प.पु.प्रदीपजी मिश्रा

भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात परळी वैद्यनाथ दि.१५ प्रभू वैद्यनाथांच्या पावन भुमीत आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेला आज सुरुवात झाली.येथील मथुरा प्रतिष्ठान कडून या कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.भगवान शंकराच्या आराधनेकरिता पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात शिव भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक असे प्रतिपादन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी केले.कथा श्रवण करण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत.



श्रावण पर्वात ही कथा संपन्न होत आहे,या कथेचे मुख्य यजमान प्रभू वैद्यनाथ आहेत त्यांच्या इच्छेशिवाय या भूमीत कथा होणे अशक्य आहे.बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा करण्याची सोमाणी परिवाराचा संकल्प आहे त्याची सुरुवात परळीच्या वैद्यनाथापासून सुरू झाली आहे.यावेळी महाराजश्रींनी विविध भक्तांनी पाठवलेले पत्र वाचून दाखवले.मनाला माळे सोबत जोडा म्हणजे परमात्मा मिळेल,शिवमहापुराणात २४००० श्लोक आहेत.या श्लोकांतील एकही शब्दही कानावर पडल्यास मानव जीवाचे कल्याण होते.भगवान शंकराची कथा परिवार जोडायाला शिकवते असेही पूज्य गुरुदेव म्हणाले.


आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला गेला हा सोहळा अभुतपुर्व होता. व्यासपीठावरून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्याना अभिवादन केले गेले.सकाळी १० वा कथास्थळी ध्वजारोहन करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कथेच्या सुरुवातीला मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांनी आपल्या परिवारासोबत व्यासपूजन केले.कथेदरम्यान महाराजांनी गायलेल्या विविध भजनांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. कथास्थळी तिरंगे बलून लावत नयनरम्य सजावट केली गेली.आरतीने प्रथम दिवसाच्या कथेची सांगता करण्यात आली.कथा श्रवण करण्यासाठी राजश्रीताई धनंजय मुंडे या उपस्थित होत्या,त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.


व्यासपीठावरील वैद्यनाथ मंदिराच्या प्रतिकृतीने वेधले भाविकांचे लक्ष -


शिवकथेस्थळी व्यासपीठावर वैद्यनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

ही प्रतिकृती अगदी हुबेहूब दिसत असून सोबत दोन दीपमाळ महादेवाची पिंड आणि नंदी महाराज असा मनमोहक नजारा भाविकांना भारावून टाकणारा आहे. मंदिराकडे कावड घेऊन जाणारे कावडी असा नयनरम्य नजारा कथा श्रवण करतांना शिवभक्तांना पहावयाला भेटणार आहे.कथेचा भव्यदिव्य मंडप डोळे दिपावणारा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या