Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुंडे यांचे कार्य कौतुकास्पद |सुंदर फुलांची प्रभू वैजनाथच्या मंदिरात तिरंगीफुलांनी केली सजावट..

 

parli beed,





कौतुकास्पद | सुंदर फुलांची प्रभू वैजनाथच्या मंदिरात नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगीफुलांनी केली सजावट..

श्रावण सोमवार निमित्त धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाण कडून वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे प्रत्येक श्रावण सोमवारी सुंदर फुलांची आरास व मंदिराची नाथ प्रतिष्ठाण कडून सजावट.. होते आहे आज 15 ऑगस्ट व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दोन्हीचा संगम आणि त्यात प्रभू वैजनाथ आता श्रावणी सोमवार या त्रिसंग्रामाच्या अनुषंगाने...


परळी श्रावण सोमवार आज असा सुंदर संगम आज साधला असून, यानिमित्ताने माजी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास त्यामध्ये तिरंगी ध्वजाता सन्मान आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यात आली मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.  


.मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.


महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे, पवित्र श्रावण महिन्यात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात; त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले त्या अनुषंगाने आज आजही 15 ऑगस्ट च्या निमित्ताने विविध प्रकारे फुलांचे सजावट करण्यात आले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या