Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद वार्ता |नगरसेवक अनिल अष्टेकर यांना पितृशोक

 

भगवान रंगनाथअप्पा अष्टेकर यांचे अल्पशा आजाराने निधन; 


आज सकाळी दहा वाजता होणार अंत्यविधी

परळी वीरशैव समाजातील जेष्ठ नागरिक भगवान रंगनाथअप्पा अष्टेकर  रा.भवानीनगर, परळी वैजनाथ यांचे गुरूवार दि.24 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्ष वयाचे होते. 

नगरसेवक अनिल अष्टेकर यांचे ते वडिल होत. दरम्यान भगवान आप्पा अष्टेकर यांच्या पार्थिवावर आज वीरशेव लिंगायत स्मशान भूमी येथे सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. भवानीनगर येथील निवास स्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

भवानीनगर येथील रहिवाशी भगवान रंगनाथअप्पा अष्टेकर (वय 67) यांचे गुरूवारी रात्री 10 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. गवानअप्पा अष्टेकर हे वीरशैव समाजातील विविध सामाजिक, धार्मीक कार्यक्रमात सक्रीय सहभागी असत.अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने ते सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

भगवानअप्पा अष्टेकर यांच्या पार्थिवावर आज दि 25 ऑगस्ट रोजी वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या