Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकास्पद |यामाजी सैनिकांने स्वखर्चातून केले राष्ट्रध्वजाचे वितरण

 वडवणीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माळवदे परिवाराच्या वतीने राष्ट्रध्वजाचे वितरण 




वडवणी येथील माजी सैनिक तथा माजी सैनिक संघटनेचे वडवणीचे तालुकाध्यक्ष शिवप्रसाद माळवदे यांचं राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठा वडवणी पंचक्रोशीत सर्वांनाच अभिप्रेत आहे. त्यांची देशाविषयीची तळमळ आणि देशभक्ती हे सर्वांसाठीच प्रेरणादायी असून त्यांनी देश रक्षणासाठी आपले अर्धे आयुष्य बॉर्डरवर समर्पित केलेले असून आता सेवानिवृत्तीपासून ते आजतागायत पर्यंतही ते त्याच इच्छाशक्तीने देशाची अस्मिता, प्रेम व निष्ठा कायम ठेवत आलेले आहेत. 


    भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी स्वखर्चातून वडवणी शहरात आयोजित केलेला राष्ट्रध्वज वितरणाचा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद असून त्यांच्या राष्ट्रप्रेमाचे अनुकरण प्रत्येकानेच करायला हवे असे प्रतिपादन वडवणी शहरात माळवदे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रध्वज वितरण सोहळ्याप्रसंगी विविध उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. 

                           


      याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी शहरातील माजी सैनिक तथा माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवप्रसाद माळवदे तसेच त्यांचे चिरंजीव वडवणी येथील नामांकित दंतरोग तज्ञ डॉ.अक्षयकुमार शिवप्रसाद माळवदे यांच्या संकल्पनेतून भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वडवणी शहरात राष्ट्रध्वज वितरण सोहळा काल दि 9ऑगस्ट मंगळवार रोजी शहरातील डॉ.माळवदे यांचा दातांचा दवाखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 


   याप्रसंगी वडवणी नगरीचे नगराध्यक्ष शेषेराव जगताप, उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे, माजी सभापती दिनकर आंधळे, ज्येष्ठ नेते अंकुश शिंदे पाटील, ज्येष्ठ नेते गुलाब राऊत,ज्येष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ, माजी जि.प.सदस्य नवनाथ म्हेत्रे, मोरवड सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नारायण शेळके, डॉ.विजयकुमार निपटे, डॉ.रामेश्वर टकले, डॉ.महावीर घुमरे, नगरसेवक सचिन सानप, नगरसेवक राहुल घाडगे, छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे व्यवस्थापक ठाकूर साहेब, माजी सैनिक नारायण गदळे, माजी सैनिक मारोती कराड, माजी सैनिक रामराव मुंडे, माजी सैनिक अनिरुध्द कोठुळे, माजी सैनिक रामेश्वर पाटोळे, संपादक अनिलराव वाघमारे, पत्रकार अशोक निपटे, पत्रकार महेश सदरे, पत्रकार अशोक फपाळ, पत्रकार सावंत, भास्कर लांडे, बालाजी गार्डी, ज्ञानेश्वर फुटाणे, बाळासाहेब घुगे यांसह माळवदे परिवारातील माजी सैनिक शिवप्रसाद माळवदे, सौ.चंद्रकला शिवप्रसाद माळवदे, डॉ.अक्षयकुमार माळवदे, डॉ.सौ.दिक्षा अक्षयकुमार माळवदे-मुळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. 



  यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना व मान्यवरांच्या हस्ते इतर सर्व उपस्थित नागरिकांना तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. येत्या दि 13 ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान प्रत्येकाने घरोघरी ध्वजसंहितेचे व सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रध्वजाचे घरावर ध्वजारोहण करावे. 


कोणत्याही परिस्थितीत याबाबत हयगय होवू नये व राष्ट्रध्वजाचा व ध्वजसंहितेचा अवमान होईल असे करु नये असे आवाहनही यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 


या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार अशोक निपटे यांनी केले. तर प्रास्ताविक माजी सैनिक शिवप्रसाद माळवदे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष शेषेराव जगताप, उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे, शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार डॉ.दिक्षा अक्षयकुमार माळवदे-मुळे यांनी मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळवदे परिवार यांच्यासोबतच विठ्ठल जाधव, दिपक खोकले, अशोक शिंदे, दामोधर माळवदे, दिगांबर माळवदे, राजेश तोगे यांसह इतरांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या