Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक या डॉक्टरची आत्महत्या |पाच पानांची सुसाईड नोट |प्रेम आंधळ असतं

प्रेम विवाह केलेल्या या डॉक्टर विवाहितेच्या खोलीत 5 पानांची सुसाईड नोट


NEWS


प्रेम आंधळ असतं..... उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ही बातमी वाचायलाच हावी.. प्रेम विवाह केलेल्या या डॉक्टर विवाहितेच्या खोलीत 5 पानांची सुसाईड नोट 

     आई आणि बाबा, मला माफ करा "आई, बाबा, मला माफ करा. मी त्याच्यावर प्रेम करायची . पण तुमच्या पेक्षा जास्त नाही. मी त्याला लग्नासाठी नाही म्हणत होतो पण त्याने मला धमकावून बोलावले. त्याने फसवले आणि मी फसले. आता ही मला मरायचे नव्हते पण मी जे केले त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि आता मला एकट्याने समाजाला सामोरे जाण्याचा त्रास होत आहे.


तुमची डॉक्टर वर्षा

औरंगाबाद येथील 3 महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या डॉक्टर मुलीची पाच दिवसांपूर्वीच आत्महत्येसाठी स्वतःच घेतले इंजेक्शन तेव्हापासून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या डॉक्टरचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी आज दि 9 रोजी सकाळी मृत्यू झाला.

या प्रकरणी पती, सासू, दीरा यांच्यासह सासऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आहे. 


   याडॉक्टर विवाहितेच्या खोलीत पाच पानांची सुसाईड नोटही सापडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.वर्षा अंबादास व्यवहारे (25)आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे रा.सावरगाव पोखरी,जि.गेवराई,जि.बीड,ह.मु. सरोदे कॉलनी,रेल्वे स्टेशन


   मुलाच्या घरच्यांच्या विरोधामुळे दि 2 मे 2022 रोजी आळंदी येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात प्रेमविवाह केला होता. धनंजय पैठण येथील कंपनीत आहे तर डॉ.वर्षा या शहरातील एका खासगी रुग्णालयात नौकरी करीत होत्या. 


लग्नानंतर वर्षाच्या कुटुंबीयांनी स्वीकारलेल्या डॉक्टर वर्षला सासू सिंधुबाई, सासरे वसंत डोंगरे आणि दीर बाप्पा यांनी काही दिवसांतच पतीसह वर्षा हिला त्रास देण्यास सुरुवात केली. 


डॉ.धनंजयला पुन्हा लग्न करायचे आहे कारण तु आमच्या जातीची  नाहीस, म्हणून तु त्याला सोडून जा


त्यात ती गरोदर राहिल्याने सासू तिला सतत मारहाण करत होती. डॉ.वर्षा यांनी दि 30 जुलै रोजी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली आणि धनंजयच्या सतत मारहाणीची त्याच्यावर क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यामुळे आज एक डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे.


तिच्या पतीसोबत भांडण झाल्याने दि 3 ऑगस्ट रोजी रात्री डॉ.वर्षा यांनी खोलीचा दरवाजा बंद करून 2 हजार मि.मी. इन्सुलिन औषधाची ही मात्रा शिरामध्ये इंजेक्शनद्वारे घेतली जाते. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. डॉ.वर्षी त्यांच्या बहिणीला तिच्या पतीने सांगितले की ती फोन उचलत नाही. नातेवाईकांना बोलावले.


कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते पहाटे बीड येथून औरंगाबादला आले होते.त्यांनी डॉ.वर्षा यांना दि 4 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉ.वर्षा शुद्धीवर आल्याच नाहीत 


   खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्यामुळे 2 दिवसांपूर्वी तिच्या पालकांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते घाटीत उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी वर्षा यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत. पाच पानी सुसाईड नोट डॉ.वर्षा यांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यापूर्वी पाच पानी सुसाईड नोट लिहिली आहे. 


त्यात पती धनंजय, सासू,सासरे,दीर हे माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत. प्रेमाच्या नावाखाली पतीने फसवणूक केल्याचे लिहिले आहे. लग्नानंतर सासरची मंडळीनी त्यांचा कसा छळ केला आहे. त्याही लिहिले आहे. https://bit.ly/3POI48L एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार


त्यात मोबाईलचा लॉक या व्यतिरिक्त कोणाला किती पैसे दिले आहेत एफडी किती आहे. त्याबाबतचे क्रमांक, नोटमध्ये बँक खात्याचा पासवर्ड लिहून पैसे पालकांना द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. एक धक्कादायक घटना लोकांच्या डोळ्यांसमोर स्कार्पिओ गाडी नदीच्या पुरात पलटी झाल्याने पाच जण पुराच्या पाण्यात हजारो लोकांसमोर गाडीमध्येच जलसमाधी वाहून...


https://bit.ly/3IuZZPm


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या