Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अमर रहे..अमर रहे..मेटे साहेब अमर रहे म्हणत बीड जिल्हा गहिवरला...



विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी शेवटच्या  श्वासा पर्यंत लढा दिला...

अमर रहे..अमर रहे..मेटे साहेब अमर रहे म्हणत बीड जिल्हा गहिवरला...मराठा समाजाच्या सर्वस्व साठी संपूर्ण आयुष्य ज्यांच्या बहाल केले ते माजी आमदार शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे या लढाऊ नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित असतो.शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर लोकप्रिय असलेल्या या नेत्यासाठी बिडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला होता...


दुपारी 1वाजता शिवसंग्राम भवन येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.


विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा दिला त्याच नेत्यांला अंतिम निरोप देताना अनेक कार्यकर्ते गहिवरून गेले अमर रहे... अमर रहे.. मेटे साहेब अमर रहे या जयघोषात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती.



विनायक मेटे यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या भव्य रथात ठेवण्यात आले होते.यावेळी कुटुंबीय रथात येतातच टाळ-मृदंगाचा गजर करत विनायक मेटे यांची अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस, सुभाष रोड, शाहूनगर मार्गे कॅनॉल रोडवरील रामदेवबाबा मैदानाजवळ पोहोचेली..


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत धनंजय मुंडे पंकजा पालवे खासदार प्रीतम ताई पालवे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काही मंत्री आणि आमदार वेळेत येण्याची शक्यता होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या