Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा |शिव महापुराण कथेस आज प्रारंभ.. |सात दिवस

 



शिव महापुराण कथेच्या स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे 




महाराष्ट्रासह पर राज्यातून शिवभक्त येणार..

    आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा परळी येथे बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावन भुमीमध्ये परळीत आज दि 15 ऑगस्ट पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. या शिव पुराण कथेच्या स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे असणार आहेत. अशी माहिती या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यानी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली सांगितले आहे. परळी येथील मथुरा प्रतिष्ठानच्या वतीने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 


    परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात आज दि.15ऑगस्ट पासुन दुपारी 1 ते 4 या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण  प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.

   आज दि.15सोमवार ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी परळी येथील शिवभक्तांच्या उपस्थीतीत ध्वजारोहण होणार असुन यानंतर हवेत तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहेत. 



एकच वेळी 65 हजार भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था..

    परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावरील एकूण 33 एकरातील दहा एक्करमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्याकडून 50 हजार तर विविध सामाजीक संघटनाकडून 15 हजार अशा एकूण 65 हजार भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असुन सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत महाप्रसाद असणार आहे.



महाराष्ट्रासह पर राज्यातून शिवभक्त येणार..

    सध्या सुरू असलेला श्रावण मास या शिवाय पाचवे ज्योर्तिर्लिंगामुळे परळीत शिव महापुराण कथेला बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार  मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार असल्याने पोलिस बंदोबस्त वाढवला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी 150 सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. 



सात दिवस रक्तदान शिबिर 

बुस्टर डोस मिळणार 

    परळी येथील शिवपुराण कथा  मंडपस्थळी आज  दि 15 ऑगस्ट ते दि.21 ऑगस्ट 2022 अशा सात दिवसाच्या काळात रक्तदान शिबिर, कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तेजस सोमाणी यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या