Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खा,प्रितमताई मुंडे यांच्या कार्य तत्परतेचे शेतकऱ्यांनी केले कौतुक

 


खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बावीस गावातील शेतकऱ्यांना दिलासा

पैठण उजव्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी सोडले; माजलगाव तालुक्यातील पिकांना मिळणार संजीवनी

 शेतकऱ्यांच्या वतीने भाजप तालुकाध्यक्ष अरुण आबा राऊत व जिल्हा सचिव बबन बाप्पा सोळंके यांनी प्रितमताई यांचे आभार मानले.

 माजलगाव नाथसागर धरणातून सोडलेले पाणी माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लाभक्षेत्रात शेतीसाठी सोडण्यात यावे.या मागणीची गंभीर दखल घेत डॉ.प्रितमताई मुंडे यांनी लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. , पाटबंधारे विभागाने त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी चिंतेत, माजलगाव धरणात नाथ सागरतून

पाणी सोडले नसल्याने धरणात मुबलक पाणीसाठा होता. मात्र लाभक्षेत्रातील गावांना या पाण्याचा लाभ शेतीसाठी मिळत नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांची 'धरणी उशाला आणि कोराड घशाला' अशी परिस्थिती होती.

 जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या या त्रासाची तातडीने दखल घेत पाटबंधारे विभागाशी बोलून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. लाभक्षेत्रात उजव्या कालव्याचे पाणी काही तासांत सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. तसेच पिकांना नवसंजीवनी देणारे भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण आबा राऊत व जिल्हा चिटणीस बबन बाप्पा सोळंके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले असून त्यांनी पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 दरम्यान, पिकांसाठी पाण्याची गरज पाहता पैठण उजव्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी सोडण्यात आल्याने पिकांना वेळेवर पाणी मिळणार आहे. पावसाअभावी सुकलेली पिके पुन्हा बहरतील आणि निसर्गाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली असून,


लाभक्षेत्रातील बावीस गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तालुक्यातील व खा.प्रितमताई मुंड यांच्या कार्य तत्परतेचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या