Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बंदुकीच्या धाकावर या जिल्ह्यात धुमाकुळ घालणारे 2 दरोड्याखोर जेरबंद



BEED |दरोडेखोरांचा एक तास धुमाकूळ | बंदुकीच्या धाकावर लुटले|

PARLI-BEED | दरोडेखोरांचा एक तास धुमाकूळ पिस्तूल कानपट्टीवर लावून जीवे मारण्याची धमकी..

https://bit.ly/3Q1R8aT

बंदुकीचा धाक दाखवत बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दरोडेखोरातील दोघे जेरबंद 

या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 70 पोलीस कर्मचारी कामाला लावले होते.अखेर दोन आरोपींना हातकड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

   गेल्या आठवड्यात बीड तालुक्यातील वडवाडी गावात बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान अवचार यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला होता. याप्रकरणी दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करून लाखो रुपये व पाच तोळे सोने लंपास केले होते.


   या दरोड्यातील आरोपी विरोधात  बीड जिल्हा आणि उस्मानाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली होती.  यात सात अधिकारी आणि ७० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे या धाडसी दरोड्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यांचाही शोध सुरू आहे.


    बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली दरम्यान, बीडमध्येही दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आरोपींना कायद्याचा धाक नाही की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. बीडमधील वडवाडी गावात 8 ते 10 जणांनी बंदुकीच्या धाकावर सशस्त्र दरोडा टाकला होता.


   यावेळी दरोडेखोरांनी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख भीमाना अवचार यांचे कार्यालय व घरावर दरोडा टाकून पती-पत्नीला जबर मारहाण करून नऊ लाख रुपये रोख व पाच तोळे सोने चोरून नेले.गेल्या आठवड्यात मध्यरात्री ही घटना घडली. या धाडसी चोरीच्या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


   या घटनेतील आरोपी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे बीड तालुक्यातील वडवाडी येथील बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान आवचार यांचे घर व कार्यालय आहे. मध्यरात्री 8 ते 10 दरोडेखोरांनी अवचार यांच्या घरावर व कार्यालयावर दरोडा टाकला. बंदुकीच्या जोरावर त्यांनी ५ तोळे सोने आणि नऊ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. 


या घटनेने वडवाडी येथील बालाघाट परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांसह एलसीबीचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाची पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या