Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सत्तासंघर्षाची कोंडी |पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली

शिंदे सरकार सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली


Political News


महाराष्ट्राच्या राजकारणात सलग 40 दिवस झाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य अवलंबून असताना आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लागले होते यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल पुढे ढकलला आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. जवळजवळ 10 दिवस. विशेष म्हणजे आज शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून शिंदे सरकारवर टीका केली असून मंत्रिमंडळ विस्ताराने लोकशाहीची हत्या होत असल्याचे म्हटले आहे. 


आता शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला असताना न्यायालय काय निर्णय देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या सत्तासंघर्षाची कोंडी सुटत नसल्याचे दिसून येत आहे. 


शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती ती आता 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती . मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून ती दि 22 ऑगस्टला होणार आहे.त्यामुळे सध्याचे मंत्री आणि भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे, असे म्हणता येईल. 


सरन्यायाधीश रामण्णा दि 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी उदय लळित हे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारत आहेत. त्यामुळे आता शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील न्यायालयीन लढाई रामण्णा यांच्या कोर्टात संपते की लळित यांच्यापर्यंत पोहोचते, हे तो दिवसच सांगेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या