Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक|बिडीच्या व्यसनाने कुटुंबातील आई,वडिल मुलाचा मृत्यू

वडिलांच्या बिडीच्या व्यसनाने एकाच कुटुंबातील आई,वडिल आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू...




व्यसन माणसाचा घात करते अशीच घटना नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे घडली आहे.नांदेड जिल्ह्यात वडिलांच्या बिडीच्या व्यसनाने एकाच कुटुंबातील आई, वडिल आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.


नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील ही घटना आहे. बल्लूर येथील सूर्यकांत संक्रप्पा (वय 52) फवारणी यंत्रात पेट्रोल टाकीत भरताना त्यावेळी पेट्रोल भरत असताना त्यांच्या तोंडात पेटती बिडी तशीच होती.बीडी पित पित अचानक बिडीची ठिणगी पेट्रोल वर पडली आणि पेट्रोलचा भडका उडाला यात संक्रप्पा यांना हे आगीत सापडले.



संक्रप्पा यांचा ओरडण्याचा आवाजाने त्यांची पत्नी त्यांना वाचवण्यासाठी धावत आली. पण आग विझवण्याचा प्रयत्नात त्याही आगीच्या विळख्यात सापडला होत्या. यादोघांचा आवाजाने घरातून 20 वर्षीय मुलगा कपिल धावत आला तोही आग विझवण्याचा प्रयत्नात कपिलही गंभीररीत्या भाजला गेल्या होता. या तिघांवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्या नंतर त्यांना नांदेड येथे पाठविण्यात आले होते



दुर्दैवाने या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे याप्रकरणी देगलुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या