Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एक वही एक पेन वाटप | जि. प.शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळते |

 जि. प.शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळते  - मुख्य अभियंता आव्हाड



सध्या इंग्रजी शाळांचे पालकांना आकर्षण वाटत असले तरी जिल्हा परिषद शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळते असे प्रतिपादन परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्यअभियंता मोहन आव्हाड यांनी केले. ते शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एक वही एक पेन वाटप कार्यक्रमात बोलत होते. 

    

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी. बी. शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा. दासू वाघमारे, जेष्ठ पञकार रानबा गायकवाड, टिव्ही  9  चे पञकार संभाजी मुंडे, पञकार दताञ्य काळे, पञकार भगवान साकसमुद्रे, ओमप्रकाश शिंदे, ब्रह्मानंद कांबळे, इम्रान सर, आदर्श शिक्षक सय्यद अखिल, मनोज जाधव आदी उपस्थित होते. 

      

       डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  131  व्या जयंतीनिमित्त पञकार विकास वाघमारे, विकास रोडे यांनी एक वही एक पेन अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले. या वेळी पुढे बोलतांना मुख्य अभियंता आव्हाड म्हणाले की, माझेही चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले. मराठी आपली मातृभाषा आहे. मराठीचे मुले कुठेही कमी नाहीत. इंग्रजी जागतिक भाषा असल्याने ती शिकणे गरजेचे आहे. या वेळी रानबा गायकवाड, प्रा. दासू वाघमारे,दताञ्य काळे  आदींची भाषणे झाली. 

      

    या वेळी शाळेचे शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन नवनाथ दाने यांनी केले. तर आभार विकास वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक काळे, विकास चोपडे, आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या