माजी मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
श्री वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी यांचे आज रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
जुन्या परळीतील श्रीवैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी वय 70 वर्ष यांचे आज शुक्रवार दि 29 जुलै 2022 रोजी परळी येथील एका खाजगी दवाखान्यात ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची दुपारी 3 वा.प्राणज्योत मालवली.
दीनदयाळ नागरी सह बँक शाखा लातूर येथील शाखाधिकारी आशिष कुसुमकर यांचे वडील तर परळी येथील पत्रकार अनुप कुसुमकर यांचे ते मोठे चुलते होते.त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,2 विवाहित मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि 30 रोजी सकाळी 9 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Social Plugin