आष्टी तालुक्यात चोरट्यांनी भर दिवसा केली चोरी..
धामणगाव येथील मुळे वस्ती येथील अण्णा रामभाऊ शेतात काम करत असल्याने घराला कुलूप लावले होते.संधी फायदा घेत गुरुवारी दुपारी भर दिवसा चोरट्यांनी मुळे यांच्या घरात प्रवेश केला.चोरीच्या घटना वाढतच आहेत.
पाहुण्यांसाठी घरबांधणीसाठी आणलेले 7 तोळे दागिने व 1 लाख 50 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ही माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेची चौकशी सुरू केली आहे.
या संदर्भात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीच्या घटनां दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Social Plugin