Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आजपासूनच आचारसंहिता लागू | आयोगाची घोषणा | बीड जिल्ह्यातील 6 न.प.चा समावेश

आजपासूनच आचारसंहिता लागू | आयोगाची घोषणा | बीड जिल्ह्यातील 6 न.प.चा समावेश





            राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे.निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांचा यामध्ये समावेश आहे. आजपासूनच (दि.8 ) निवडणुकीच्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहेhttps://aplaepaper.blogspot.com/

            



अ वर्गातील बीड नगरपरिषदेसह वर्गातील अंबाजोगाई, माजलगाव, परळी,गेवराई, धारूर या पाच नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जिल्हाधिकाऱ्यांकडून दि.20जुलै रोजी करण्यात येत आहेत. त्यानंतर नामनिर्देशनपत्र दि.22 जुलै रोजी सकाळी 11वाजता ते दि.28 जुलै रोजी दुपारी 2वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरता येईलhttps://aplaepaper.blogspot.com/

         भरलेली नामनिर्देशन

         पत्रे स्वीकारण्याचा कालावधी दि.22 दि.28 जुलै दरम्यान सकाळी 11ते 3 या वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) असणार आहे. नाम    निर्देशन पत्राची छाननी व वैधरीत्या नाम   निर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दि.29 जुलै रोजी सकाळी 11    वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दि.4ऑगस्ट दुपारी 3   वाजेपर्यंत असेलअपील करायचे असल्यास, अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी📣#SHIVSENA | या संघर्षात गेम कोणाचा वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..| https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_63.html#.YsfUxeK3e4I.whatsapp

           


 मात्र     दि8ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया करता येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह घेऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. मतदानाचा दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत असणार आहे. मतमोजणी व निकाल दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला कळविली आहे📣#SHIVSENA | या संघर्षात गेम कोणाचा वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..| https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_63.html#.YsfUxeK3e4I.whatsapp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या