Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'हे'|पोलिसच निघाले चोर | गुटखाची 'यां' नी 23 पोते केली लंपास

 'हे' |पोलिसच निघाले चोर | गुटखाची 'यां' नी 23 पोते केली लंपास


big news

https://aplaepaper.blogspot.com

नेत्याचा | 'हा' व्हिडिओ डिलीट| काय होते गुपीत | वाचा

https://bit.ly/3POdpbH

स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदेशीरपणे धंदे सुरूच..

नुकताच 16 लाखांचा गुटखा ठाणेप्रमुखानेच गायब केल्याचे बीड पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासानंतर समोर आले आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक डी.बी.कोळेकर यांच्यासह अन्य दोघांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 




के.जे.चे सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांना दि 20 जुलै रोजी कर्नाटकातून नगरला गुटखा जात असल्याची माहितीच्या आधारे, पाटोदा पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. पाटोदा पोलिसांनी  सायंकाळच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पकडला खरा . त्यात 50 गुटख्याच्या गोण्या होत्या. मात्र या कारवाईनंतर कंटेनर एका खासगी कार्यालयात नेऊन त्यातून 16 लाख रुपये किमतीची 23 पोती जप्त करण्यात आली. 



त्यानंतर पंचनामा करून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून 24 लाख 57 हजार किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पाटोदा पोलिसांच्या कारवाईवर वरिष्ठांना संशय आला. त्यामुळे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अधीक्षक पंकज कुमावत यांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार कुमावत यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. 




आरोपींची चौकशी करून गुटखा जप्त केला. त्यानुसार 50 पैकी 16 गुटख्याच्या पिशव्या गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कुमावत यांनी आपला तपास अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक डी.बी.कोळेकर, पो.नि. संतोष क्षीरसागर, कृष्णा डोके यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. 




स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदेशीरपणे धंदे सुरूच आहेत. 

पोलिसांच्या विरोधात कोण तक्रार देणार , कोणी तक्रारदार पुढे येत नाही. परंतु पाटोदा पोलिसांनी कारवाईत गुटखा पिशव्या लंपास केल्याचे समोर आल्यानंतर गुटखा विक्रेत्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा होत होती म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्याने या सर्व घटना उघडकीस आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या