Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BIG NEWS |चोरट्यांचा धुमाकूळ |50 तोळे सोने |दीड लाख रु घेऊन फरार

  डॉक्टरच्या घरात | पहाटे 2 वाजता चोरट्यांचा धुमाकूळ 

| 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार



  










 नांदेड - जुन्या शहरात घर असलेल्या हादगाव येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ.पवन शेट्टी (३१) यांच्या घरात  दि 16 जुलै रोजी पहाटे 2 वाजता चोरट्याने मागच्या दाराने आत प्रवेश करुन बाहेर डॉक्टरचे आई-वडील प्रमोद शेट्टी (58) आणि प्रतिभा शेट्टी झोपले होते. चोरट्यांनी दागिने व पैसे कोठे ठेवले आहेत , अशी विचारणा केली; मात्र प्रतिभाबाईंनी त्याला  प्रतिकार केला दरोडेखोरानी त्याच्यावर हल्ला केला.



  

डॉक्टरांच्या खोलीत शिरून . त्यांच्या सहा महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन जाण्याची धमकी देऊन त्यांनी दागिने मागितले. नंतर हात-पाय बांधून  त्यांना  बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यावर चाकू लावला. यासह 6 महिन्यांच्या बाळाला उचलून घेऊन जाण्याची धमकी देत चोरट्यानी घरातील  50 तोळे सोन्याचे दागिने लुटले.

      हे ही वाचा चौकशी सुरू | 29 लाख 85 हजार | रुपयासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात |

https://bit.ly/3ckYSGe



घटना घरात घडत असताना  तेव्हा पोलिसांची गाडी दारातच होती. आणि चोर घरात असताना कोणीही ओरडत नव्हते. यावेळी दारात पोलिसांची गाडी गस्तीसाठी उभी होती, मात्र सर्वांना  बांधलेले व गळ्यावर चाकू असल्याने कोणीही आरडाओरड करू शकले नाही. हा  धुमाकूळ अर्धा तास चालूच होता. .



 30 वर्षांपूर्वी या घरात अशीच चोरी झाली होती. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सोन्याच्या बांगड्या, मणी मंगळसूत्रासह 50 तोळे सोन्याची बिस्किटे व दीड लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. चोरट्यांनी त्यांचे कपडे घटनास्थळी फेकून दिले आहेत. व डॉक्टरांचे कपडे घालून. चोर मोटारसायकलवर फरार झाले  चोरीसाठी आणलेल्या मोटारसायकल गावातील अण्णाभाऊ साठे चौकात उभ्या होत्या. 

'या' वस्तूंच्या किमती वाढणार | 18 जुलैपासून घरगूती खर्चात होणार वाढ..

https://bit.ly/3IGXvOg

   



तेथील तरुणांनी पोलिसांना माहिती देऊन दोन मोटारसायकली ताब्यात दिल्या.परंतु  चोरटे फरार झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपासासाठी नांदेड येथील श्वानपथकासह एलसीबीचे अधिकारी व हदगाव येथील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड  करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या