Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संघटनाचे..वास्तव दुर्दैवी आहे


महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत. मला कुणावरही टीका करावयाची नाही. मात्र वास्तव परिस्थिती अशी आहे की कोणत्याही संघटनेला संघर्ष नको आहे

तडजोडीने अर्ज विनंत्या करून लाचारीने जेवढे मिळेल ते घेण्याचा प्रयत्न संघटनांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे  संघटनेचा खरा हेतूच आपण विसरून गेलो आहोत*. संघटना याचा अर्थच संघर्ष असा आहे. आज मात्र तो अर्थ कुठल्याही संघटनेमध्ये आज दिसत नाही. मागील विस वर्षांमध्ये संघटनेच्या प्रश्नासाठी किती आंदोलने झाली किती मोर्चे निघाले. आणि त्याची शासनाने किती दखल घेतली. हा संशोधनाचा विषय आहे. 




आम्ही संघर्ष सोडून देऊन इतर मार्ग चोखाळले आहेत. त्यामुळे संघर्ष नसेल तर संघटनेचे प्रश्न कसे सुटणार?* संघटनेला संघर्षाशिवाय पर्याय नसतो. संघटनेची निर्मिती ही केवळ आणि केवळ संघर्षासाठी केलेले असते, हे विसरून चालणार नाही. संघर्ष नसेल तर  संघटना हे केवळ पार्थिव असेल.नख्या आणि दात नसलेला वाघोबा असेल.  आपला                                                                                 EXPRESS  epaper (https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post.html)
नियमबाह्य | पार्किंग गाडीचा फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला | पाचशे रुपयांचे बक्षीस
Important news. That's the next step.apalaepaper apla paper news majha news newsmahja 





या सर्व बाबीचा विचार करून सर्व संघटनांनी संघर्षात्मक कार्यक्रमाची आखणी करण्याची नितांत गरज आहे त्याऐवजी अनेक संघटनेने जे अनेक ग्रुप तयार केलेले असतात ते ग्रुप फक्त त्यामुळे आपले प्रश्नच आपण विसरून गेलो आहोत.यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय? या वेळेच्या अपव्यय आतून काय साध्य होणार आहे याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. 

             


 आपल्या संघटणेला हक्क मिळवून द्यायचे असेल तर एकत्र येऊन सतत संघर्षाचे कार्यक्रम आखले गेले पाहिजेत*. त्यामध्ये मोर्चे काढणे, धरणे धरणे,निषेध करणे.,सविनय कायदेभंग करणे आदि कार्यक्रम आखले गेले पाहीजेत. *राज्य  शासनावर सतत दबाव निर्माण केला पाहीजे. सतत आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले पाहीजेत.सतत पाठपुरावा केला गेला पाहीजे*. या प्रक्रिया कराव्या लागतील . ते शासन व्यवस्थेपुढे स्वतंत्रपणे मांडवे लागतील आणि न्याय मिळवावा लागेल. आपला सेवक बांधव अत्यंत  अनेक समस्यांनी ग्रासलेल्या असून आज ही आपल शोषण सूरु आहे  प्रश्न आहेत तसेच पडुन राहिले आहेत, 



शैक्षणिक क्षेत्रात खाजगीकरणाचा घाट सरकार घालत आहे.सेवक माणधन तत्वावर नेमून हे सरकार काय साध्य करणार आहे,घोड्याच्या शेजारी चालण्यामुळे गाढव कधी घोडा बनत नाही याची कृपया जाणीव असावी .*आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत. त्यासाठी दुसरा कोणीही येणार नाही आणि जर कोणाची वाट पाहत असाल तर ती लाचारी असेल*. आपण कमजोर नाहीत. खूप शक्तिशाली आहोत आपण .हे आपल्या सर्वांना ही माहित आहे. आपल्याला फक्त भीती आहे की हे होऊ शकते की नाही.भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत. *जब तक तुम डरते रहोगे, तुम्हारे जिंदगी के फैसले दुसरे लोग ही लेते रहेंगे. मग आपण डरपोक आहोत का* ? तर नाही आहोत. मग आपल्या अस्तित्वाचे आणि जगण्याचे निर्णय कोण घेत आहे. ते आपण का घेत  नाही. मग दुसरा कोण घेत आहे ?याचा विचार करा .पुन्हा पुन्हा करा. आपण याचे उत्तर शोधू शकतो. आपल्याला हे समजते सुद्धा. मात्र आपण फक्त झोपलेलो आहोत. झोपेतून उठा. रात्र वैऱ्याची आहे.गुलामीची आहे.लाचारीची आहे.



संघटणेच नुकसान हे कोण्या विरोधकांमुळे होत नसून आपल्यासारख्या चांगल्या लोकांच्या निष्क्रियतेमुळे होत आहे हे विसरू नका.पाॅवर आणि हक्क भिक म्हणून मिळत नसतात.त्यासाठी रक्त द्यावे लागते.संघर्ष करावा लागतो.हेच अंतीम ध्येय संघटनेचे असले पाहीजे, महाराष्ट्र राज्य खाजगी चतूर्थश्रेणी संघटणेच हेच अंतिम ध्येय आहे.आपण सर्व पदाधिकारी,सेवक बांधव  आपण सर्वजण या शैक्षणिक चळवळीच्या  संघर्ष लढ्यात  सामिल व्हाल यात मला तरी  तिळमाञ शंका नाही 

धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या