Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद ..

थेट प्रेक्षपण....आपल्या  प्रगती सिटी केबल वर
live दर्शन......! परळीतील भक्तांसाठी  वेळ पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत वैजनाथ मंदिर लाईव्ह राहणार
परळी // राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परळी येथील देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद असेल अशा सूचना बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आज रोजी  सोमवारी दिल्या आहेत. तसे पत्र सायंकाळी 6वा च्या सुमारास मंदिर सचिवास प्राप्त झाले. 
Breaking.!भाविकांसाठी उद्या पासून ३१ मार्चपर्यंत परळी वैद्यनाथच्या गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीचे प्रगती सिटी केबलव्दारा live 

दर्शन थेट प्रेक्षपण....आपल्या 
live दर्शन......! परळीतील भक्तांसाठी  वेळ पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत वैजनाथ मंदिर लाईव्ह राहणार 


परळी// बीड जिल्ह्यातील बारा ज्योर्तिलिंग पैकी पाचवे प्रभू वैद्यनाथचे मंदिरातील  live दर्शन  आता थेट केबलद्वारा पाहता येणार म्हणजेगाभाऱ्यातील वैद्यनाथचे पिंडीचे live दर्शन व दररोज होणारी आरती प्रत्येक घरात  टेलिव्हीजन द्वारे पाहाता येणार. प्रगती सिटी केबल च्या माध्यमातून आपल्या घरातील सेट अप बॉक्स चॅनेल नंबर UCN 652 प्रगती live पाहता येणार आहे  दररोजची महापुजा ,सकाळ व संध्याकाळच्या आरतीचे थेट पाहता येणार आहे महापूजा सुध्दा लाईव्ह पाहता येणार आहे. @@@संपर्क-9860885642

दरम्यान, मंदिरातील दररोजची पूजा नियमित होणार असून त्यासाठी केवळ पुजारीच उपस्थित राहणार अशी माहिती वैद्यनाथां देवस्थान समितीचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी सांगितले आहे आज सोमवारी प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती.राज्य व परराज्यातून येथे श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गेल्या दोन दिवसापासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटली आहे. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भक्तांची मंदिरात स्वच्छता करून विशेष खबरदारी घेतलेली आहेच. तसेच २ एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला गीत रामायण हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. येथील वैजनाथ मंदिरात दररोज सकाळी दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते व सायंकाळच्या वेळी शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. तसेच रात्री सव्वा नऊच्या सुमारास दररोज आरतीला भक्तांची गर्दी होते  भक्तांची गर्दी टाळण्याच्या सूचना बीडच्या जिल्हा प्रशासनाने दिली आहे.