Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत दगडाने ठेचून तरुणाचा निर्घुण खून


अंबाजोगाई //खाजगी कामानिमित्त हैदराबादहून अंबाजोगाईला आलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घुण खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

रसूल सत्तार कुरेशी (वय ३२, रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. रसूल एक महिन्यापूर्वीच कामानिमित्त हैदराबादला गेला होता. परंतु, काही खाजगी कारणास्तव तो रविवारी अंबाजोगाईला परतला होता. सोमवारी रात्री ८.३० वाजता तो लहान भावाची दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी आला नव्हता. सर्व कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता मंगळवारी सकाळी रसूल घेऊन गेलेली दुचाकी भाजी मंडीतील शासकीय रूग्णालयाजवळ आढळून आली होती. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या ५ सुमारास चेहरा छिन्नविछिन्न झालेला रसुलचा मृतदेह येल्डा रोडवरील दासोपंत स्वामी समाधी परीसरालगत आढळून आला. मृतदेहाच्या खिशातील कागदपत्रांवरून तो रसूलच असल्याची ओळख त्याच्या कुटुंबीयांनी पटविली. मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून रसूलचा खून करण्यात आला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दहिफळे आणि उपनिरिक्षक सोळंके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी रसूलचा भाऊ साबेर सत्तार कुरेशी यांच्या खबरीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. शहर पोलीस खुनाचा उलगडा करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. मयत रसूलच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

@@@@विवेक सिंधु न्यूज