Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यात शाळाना सुट्टी जाहीर, इंग्रजी शाळाही राहणार बंद; सीईओ कुंभार यांचे आदेश

बीड येथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय काल घेतला. या संदर्भात बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना उद्यापासुन शाळा बंदचे पत्र काढले आहे.बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सरकारी, खाजगी शाळा यांना दि.३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केल्याचे पत्र काढले आहे.
राज्य शासनाच्या सुचनेनुसार दि.३१ मार्च २०२० पर्यंत शाळा बंद ठेवाव्यात. 
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावावर आळा घालण्यासाठी शाळांना सुटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील शहरी भागातील (तालुका ठिकाणच्या) शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी असणार आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचाही समावेश असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत शनिवारी (ता. १४) रात्री उशिरा प्रशासनाला सूचना दिल्या.सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शाळा . महाविद्यालयांना सुटी देण्याचे आदेश निर्गमित केले आहे. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील सर्व शाळांना सुटी देण्यात
येणार आहे. त्यानुसार सीईओ अजित कुंभार यांनी शिक्षण विभागाला तसे आदेश दिले आहेत. यामध्ये बीडसह सर्वच तालुक्याच्या ठिकाणच्या शाळांना सुटी देण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. दरम्यान, बीड, केज, अंबाजोगाई, परळी, पाटोदा, शिरूर कासार, आष्टी, माजलगाव, धारूर व वडवणी या सर्व ठिकाणी नगरपालिका किंवा नगरपंचायती असल्याने या ठिकाणच्या जिल्हा परिषद, संस्थांच्या अनुदानित आणि विनाअनुदानित तसेच इंग्रजी शाळांना सुटी असणार आहे.