Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत नुकतेच जन्मलेले अर्भक काटेरी झाडामध्ये फेकले!


परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी सोमवारी (दि.24) सायंकाळी  8 वा.सुमारास एक दिवसाचे स्त्री जातीचे एक अर्भक आढळून आले. परिसरातील नागरिकांनी अर्भक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सदरील अर्भक हे स्त्री जातीचे असून काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  फेकल्यामुळे बाळाच्या अंगात काटे रुतले असल्यामुळे प्रकृती चिंताजनक असून उपचार सुुरु आहे. या घटनेने परळी शहरात एकच खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत पोलीसात नोंद नव्हती 

बरकतनगर परिसरात रेल्वेट्रॅकच्याबाजुला बाळ रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आला. त्यांनी पाहिले असता एका कपड्यात गुंडाळेलेले जिवंत अर्भक आढळले. त्यांनी काही पत्रकारांना फोन करुन प्रकरणाची माहिती दिली व पत्रकार बाबा शेख, अमोल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जावून बाळाला तात्काळ परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामुळे याबाळाचे प्राण वाचले..!