Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड केज -अंबाजोगाई रस्त्यावर भिषन्न अपघात






बीड पिकअपच्या धडकेत बसमधील तिघे जागीच ठार; १२ जखमी

▪ अंबाजोगाई - केज रोडवरील भीषण अपघात

अंबाजोगाई // मस्तवाल पिकअप चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून समोरून येणाऱ्या एसटी बसला जवळून कट मारला. त्यामुळे पिकअपवरील लोखंडी जाळ्यांना अडकून बसची उजवी बाजू कापली गेली. या भीषण अपघातात बसमधील तीन प्रवाशी जागीच ठार झाले तर १२ जण जखमी झाले आहेत. काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात बुधवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास अंबाजोगाई केज रोडवरील चंदन सावरगाव येथे घडला. 

औरंगाबाद- मुखेड (एमएच २० बीएल ३७२१) ही मुखेड आगाराची बस दुपारी १.३० वाजता केज बस स्थानकातून अंबाजोगाईच्या दिशेने निघाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही बस दुपारी १.४५ वाजता चंदनसावरगाव जवळ आली असता त्याचवेळी कोंबड्यांची वाहतूकीसाठी वापरला जाणारा पिकअप (एमएच २३ डब्ल्यू २१७४) हा टेंपो विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने येत होता. रस्ता अरुंद आणि त्यात समोरून मोठी बस समोरून येत असल्याचे पाहूनही या टेंपोचालकाने वेग कमी केला नाही आणि बसला अतिशय जवळून कट मारला. त्यामुळे टेंपोच्या मूळ आकारापेक्षाही बाहेर आलेल्या कोंबडे ठेवण्याच्या लोखंडी जाळ्या बसच्या मध्यभागाला अडकल्या आणि त्यामुळे बसचा पत्र फाटून निघाला. यावेळी उजव्या बसमध्ये बाजूने खिडकीच्या कडेला एकापाठीमागे एक बसलेल्या तिघा प्रवाशांना गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य १२ जण जखमी झाले. मृतात विजयालक्ष्मी बाळासाहेब देशमुख (वय ५५, रा. मोहखेड, ता. मुखेड), अनिल मोतीलाल कवलकर (वय ५०, रा. उमरगा) आणि शाम वसंत राजगीरवाड (वय ३७, रा. चेरा, ता. जळकोट) या तीन प्रवाशांचा कागीच मृत्यू झाला. तर, बालाजी मारोती गाढवे (वय ५०, रा. जांब, ता.मुखेड), दत्ता रघुनाथ मोरे (वय ३५, रा. लातूर), विकास दास (वय ४०, रा. कोलकाता), डॉ. विष्णुकांत गायकवाड (वय ३०, रा. हाळी हरंगूळ), डॉ. संतोष ज्ञानोबा गुणाले (वय ३०, रा. उदगीर), शीतल सुनील मायकर (वय २५), अशोक बबन जाधव (वय ४०, रा. खडकवडे), अलफिया अझर सिद्दीकी (वय २१, रा. अंबाजोगाई), शिवनाथ गायकवाड (वय ३५, रा. गेवराई), मीना अशोक जाधव (वय ४०, रा. पाटोदा), सरुबाई राजगीरवाड (वय ६०, रा. चेरा ता.जळकोट, जि.लातूर) आणि देवानंद दत्तात्रय शिंदे (वाहक)(वय ४५, रा. गुंटूर, नांदेड) हे गंभीर जखमी झेल आहेत. जखमीपैकी बालाजी गाढवे यांना या अपघातात उजवा हात कोपऱ्यापासून गमवावा लागला आहे तर डॉ. विष्णुकांत गायकवाड यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, या अपघातात पिकअप चालकाने पलटी झालेल्या पिकअपमधून बाहेर येत घटनास्थळाहून लागलीच पळ काढला.