आजच्या डिजिटल युगात अशक्य असं
काहीच नाही ..
मुंबई // तुम्ही इंटरनेटचा वापर न करता, नेटवर्कच्या समस्येशिवाय तुमच्या फोनवरुन बँकिंग करण्यासाठी अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्विस डेटाचा (USSD) वापर करु शकतात.मोबाइल बँकिंगची आजच्या डिजिटल जमान्यात आवश्यक झाले आहे. परंतु असे असताना इंटरनेटची समस्या असल्यास पेमेंटसंबंधित अडचणी अनेकदा सहन कराव्या लागतात. पण तुम्ही आता ऑफलाइन डिजिटल पेमेंट देखील सहज करु शकतात.
USSD या आधुनिक तंत्रज्ञानामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी शिवाय तुम्ही पेमेंट करु शकतात. आरबीआयच्या दिशानिर्देशांनुसार या प्रकाराचा वापर 5,000 रुपयांपर्यंत छोट्या मुल्याच्या व्यवहारासाठी केला जाऊ शकतो. USSD हा एक राष्ट्रीय एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. ज्याला NUUP च्या नावे देखील ओळखले जाते. ही एक मोबाईल बँकिंग सेवा आहे. हे जीएसएम नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून माहिती प्रसारात करण्यासाठी USSD चा उपयोग करतात.
इंटरनेटचा वापर करुन वापरण्यात आलेल्या वित्तीय संचार सुविधेचा वापर करण्याची ही सुविधा यात देण्यात येते. तुम्ही तुमच्या खात्यातून जमा रक्कम तपासने, मिनी स्टेटमेंट जनरेट करणे, MMID च्या माध्यमातून फंड ट्रांसफर, IFSC कोड किंवा आधार क्रमांकासहित विविध सुविधांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
इतर सेवांमध्ये ओटीपी, एम पीन आणि व्हीएएस सारख्या सेवांच्या लाभ मिळतो. NUUP फंड ट्रांसफरसाठी IMPS प्लॅटफॉर्मचा देखील उपयोग होतो, यासाठी यामुळे एकदा पेमेंट केल्यास ते रोखले जाऊ शकत नाही किंवा रद्द केले जाऊ शकत नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार भविष्यात 41 प्रमुख बँक आणि सर्व जीएसएम सेवा देणाऱ्याद्वारे *99# वर सेवा प्रदान केली जाते आणि 13 विविध भाषांमध्ये या सेवेचा लाभ घेतला जातो. परंतु या सेवेचा वापर करण्यासाठी यूजरला मोबाइल बँकिंगसाठी आपला नंबर पहिल्यांदा रजिस्टर करावा लागेल. त्यासंबंधित विस्तृत माहिती NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
तुम्ही यूएसएसडी अंतर्गत निम्मलिखित सेवांचा वापर करता येईल –
1. पैसे पाठवणे
2. पैसे मागवणे
3. जमा रक्कम तपासणे
4. पैशांचा व्यवहार करणे
5. मागील 5 व्यवहारांची माहिती घेणे
6. UPI पिन सेट करणे, बदलणे


Social Plugin