Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह




परळी // सोमवारी सकाळी हैद्राबादकडे जाणारी पूर्णा-हैद्राबाद पॅसेंजर गाडी इंजिन बदलण्यासाठी स्थानकावर थांबलेली असताना एका डब्यात आवाज झाला. एका प्रवाशाने सुतळी बॉम्ब आपल्या तोंडात पेटवल्याने तो त्याच्या तोंडातच फुटल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.परंतु रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


 पूर्णा- परळी -हैदराबाद' रेल्वेच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये तोंडात फटाका फुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (२३ ) सकाळी येथील रेल्वे स्थानकात घडली. सय्यद अक्रम (१९ ) असे जखमी युवकाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.तो प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्या प्रवाशाबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र, या सर्व प्रकाराने रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्फोटक पदार्थाना बंदी असतानाही त्या प्रवशाजवळ सुतळी बॉम्ब कसा आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.