◼कोल्हापुर //कतारळेतील कॉलेज तरुणीचा संशयास्पद मृत्यू आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मंदिरात गेलेल्या कॉलेज तरुणीचा त्याच मंदिरातील घंटेला लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घंटा जमिनीपासून तब्बल सात फुटांवर असल्याने हा घातपात असावा, असा नातेवाईकांना संशय आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या कॉलेज तरुणीचा रविवारी वाढदिवस होता. त्यामुळे ती सकाळपासून खूपच आनंदात होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत कसबा तारळे-दुर्गमानवाड रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरात गेली होती. तिथे तिचा वाढदिवस जल्लाषोत साजरा करण्यात आला. त्यानंतर सगळेजण परतले; पण काही वेळाने परिसरातील शेतात काम करणार्या काही महिलांना मंदिरातील सात फूट उंचावर असणार्या घंटेला लटकलेला मृतदेह आढळला. घाबरलेल्या या महिलांनी याची माहिती इतरांना दिली.
दरम्यान, हा मृतदेह कसबा तारळेतीलच या युवतीचा असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या कुटुंबीयांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर राधानगरी पोलिस ठाण्यात वर्दी देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला; पण नातेवाईकांनी इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्याची मागणी केली. माजी सरपंच शौकत बक्षू यांनी नातेवाईकांच्या वतीने पोलिसांना इन कॅमेरा तपासणी करण्याची विनंती केली.माहिती सेवा ग्रुप पेठवडगावची पोस्ट, त्यानंतर मृतदेह कोल्हापूरला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
@रुग्णवाहिका अडवली
दरम्यान, कोल्हापुरात सीपीआरे आवारात मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका नातेवाईकांनी रोखून धरली. जोपर्यंत संशयित सापडत नाहीत, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही, असा नातेवाईकांनी पवित्रा घेतला. शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली. यावेळी लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी नातेवाईकांची समजूत काढली. इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचे मान्य केले. तेव्हा लोक शांत झाले. रात्री उशिरापर्यंत लोक बसून होते. तणावाचे वातावरण असल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.


Social Plugin