बीड // जिल्हा हाकायम दुष्काळाच्या छायेत असल्यामुळे येथील मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांनाऊस तोडणीच्या कामसाठी घरदार सोड्न मुला बाळासहित पोटाची भरण्यासाठी साखरकारखान्यावर जावे
लागते कारखान्याच्या बाजूलाच उसाच्या
फडात कोप्या उभारुन जगतात.जिल्ह्यातील अनेक ऊसतोड मजूर पोटासाठी भटकत असतात.त्यात मजुरांच्या लेकरांची मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात फरफट होते.प्रश्न पडतो तो हा की ,त्यामुलांना सांभाळ करणारे सरकारचे पाळणा घर गेले कुठे उसाच्या फडात लहान लेकरांना ते तिचे टाकून त्यांचे पालक आपल्या कामात व्यस्त दिसतात
ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात नेहमीच संघर्ष आणि समस्या असतात त्या संघर्षातही ते सतत समाधानी आनंदी असतात याचं जिवंत उदाहरण आज कॅमेरात टिपताना मनात अनेक प्रश्न लिहिलं होतं याप्रश्नांपैकी काही प्रश्नाला आमचे कवीमिञ प्रा.पंजाबराव येडे यांच्या यांच्या कवितेतून वाट मिळाली .....!
आई गरीबीचं रडगाणं,कधींच गाणारं नाही, आले किती अडथळे मी माघार घेणारं नाही!आज आभाळाला,माझी दया आलीय, थोडावेळ का होईना,त्यानं सावली धरलीय.
पाचराटाच्या गादीवर,निद्रिस्त भवितव्य तुझं आहे,संघर्षाच बाळकडू,जन्मजात नशीब माझं ..


Social Plugin