Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ..!स्कॉर्पियो गाडीत सापडला रक्ताने माखलेला मृतदेह



परळी// तालुक्यात असलेल्या सिरसाळ्या जवळ स्कॉर्पिओ गाडीत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सिरसाळा जवळ असलेल्या कावळेचीवाडी – म्हातारगाव रोडवर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहे
प्राथमिक माहितीनुसार विजय सखाराम यमगर (वय 30, रा. दगडवाडी ता. परळी) असे या  मृत व्यक्तीचे नाव आहे. कावळेचिवाडी-म्हातारगाव रोडवर रस्त्याच्याकडेला रात्रीपासून एमएच-24 व्ही-5148 क्रमांकाची स्कार्पिओ उभी होती. मंगळवारी सकाळी शेतात जाणार्‍यां लोकांनी ही गाडी पाहिली मात्र गाडीत डोकावून पाहिले असता गाडीत कुणीच दिसले नाही. त्यावेळी पाठीमागच्या सीटवर रक्ताने माखलेला मृतदेह काही जणांना आढळून आलायासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपअधीक्षक राहुल धस व परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजय यमगर यांचा शर्ट संपूर्ण रक्ताने माखलेला असून डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आले असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. हा प्रकार खुनाचा असून पोलीस हा खून कोणी केला याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सिरसाळा परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.