Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत...! अवघ्या 20 रुपयांत कष्टकरी बांधवांना जेवण दिले जाणार ....

मराठवाडा साथी परिवाराच्या अन्नछत्रात 20 रुपयांत मिळणार जेवण मोहनलाल बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परिवाराचा उपक्रम



परळी //अवघ्या 20 रुपयांत कष्टकरी बांधवांना जेवण दिले जाणार वाढत चाललेली महागाई, कामाच्या ताण-तणावात कष्टकर्‍यांचे भोजनाकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन अत्यंत स्वादीष्ट असे भोजन आम्ही फक्त 20 रुपयांत उपलब्ध करुन देत आहोत. अन्नछत्र हे केवळ सेवाभाव या वृत्तीने चालविण्याचा चंदुलाल बियाणी यांचा हा  संकल्प आहे.

 ,दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकसहभागातून सुरु करण्यात येणार्‍या अन्नछत्राचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी माजी नगराध्यक्षा श्रीमती राधाबाई बियाणी यांच्या हस्ते होत आहे. राधा-मोहन साथी प्रतिष्ठान, राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट, मारवाडी युवा मंच व मराठवाडा साथी परिवाराने हा उपक्रम हाती घेतला असून दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या अन्नछत्राचे उद्घाटन उद्या गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी अशोक जैन प्रतिष्ठाण, बचपन प्ले स्कुल जवळ, कावेरी प्लाझा हॉटेलच्या मागे सकाळी 11 वा. माजी नगराध्यक्षा श्रीमती राधाबाई बियाणी यांच्या हस्ते होत आहे. अवघ्या 20 रुपयांत सामान्य नागरिकांसाठी येथे भोजन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सर्व सामान्य नागरिक, कष्टकरी कामगार बांधव यांच्यासाठी अत्यंत माफक दरात भोजन दिले देण्यात येत आहे. याच सोबत पार्सल व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जेवणासाठी दररोज सकाळी 11 वा. पर्यंत नाव नोंदणी आवश्यक असून भोजन वेळ दु. 12 ते 3 अशी राहील.
दै. मराठवाडा साथी परिवारासह राधा-मोहन साथी प्रतिष्ठान, राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट, मारवाडी युवा मंच यांचा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला राजस्थानी मल्टीस्टेट, राजस्थानी नागरी पतसंस्था, पोदार लर्न स्कुल, बचपन प्ले स्कुल, सुयोग अ‍ॅक्वा, डीफएसी जिम, मराठवाडा साथी मल्टी सर्व्हीसेस या संस्थेचेही सहकार्य लाभणार आहे. दरम्यान, शुभारंभ कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.

माफक दरात भोजन