Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक .,!माजलगाव शहरांमध्ये स्त्री जातीचा अर्धवट जळालेले सांगडा आढळला.; आरोपी अटक



कत्तीने कापून पत्नीची क्रूर हत्या;मृतदेहाचे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये


दोघांनी केला होता प्रेम विवाह; पहाटे अर्धा भाग नाल्यात जाळल्याने घटना आली उघडकीस

माजलगाव //शहरातील अशोकनगर भागात सोमवारी सकाळी नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा आढळुन आल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून तपास लावल्याने सदरील प्रेत रेश्मा संजय साळवे हिचे असल्याचे स्पष्ट झाले. पतीनेच घरात नऊ दिवसांपूर्वी तिची क्रूर हत्या करून प्रेताचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. आज सोमवारी कंबरेपासून वरचा भाग नाल्याच्या काठावर जाळून नष्ट केला त्यावरून ही हत्या उघड झाली. 

सोमवारी अशोकनगरखालच्या भागात आसलेल्या नाल्याच्या कडेला अर्धवट अवस्थेत जळालेला मानवी सांगाडा आढळुन आला, प्रेताचे पुर्ण शरीर या ठिकाणी कोणीतरी जाळुन टाकले आसल्याचे दिसुन आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठांना माहिती दिली, त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ढीसले यांनी भेट दिली. या परिसरातल्या नागरिकांनी पहाटे एक व्यक्ती हातात बकेट घेऊन व दोन मुलांना सोबत घेऊन आला होता ही माहिती पोलिसांना दिली तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचे सांगितले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची अधिक माहिती घेण्यास सुरु केले. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना रेश्मा ही महिला मागील आठ दिवसापासून बेपत्ता असल्याचे कळाले, त्यावरून पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी चक्रे फिरवून संजय साळवे यास तत्काळ ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने दि.३० नोव्हेंबरला रेशमाची कत्तीने क्रूर हत्या केल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले तेथे वास येत असल्याने फ्रीज तपासणी केली असता फ्रीजमध्ये तिच्या शरीराचे कमरेखालील भागाचे तुकडे आढळुन आले.या हदरवणारी घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दोघांनी केला होता प्रेम विवाह 
अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व इंदिरानगर भागात राहणारी रेश्मा पठाण यांनी दोन्ही कुटुंबाचा विरोध डावलून लग्न केले होते. संजय याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने फातेमानगर मंजरथ रोड येथे रेश्मासोबत रहात होता. या दाम्पत्यास  एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले होती. अवघ्या चार तासात पोलिसांनी पती संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान यास अटक करून त्याच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले रेशमाच्या शरीराचे तुकडे जप्त केले आहेत. या घटनेने शहर हादरून गेले आहे.